शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट! आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्या गरबा आयोजकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 22:01 IST

लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांकडून आयोजकांना कारवाईचा इशारा

मीरारोड - मीरारोडमध्ये रात्री ११ नंतरही सर्रास गरब्याचा दणदणाट सुरु असल्याचे वृत्त लोकमतने देताच पोलिसांनी नवरात्रोत्सव मंडळांची बैठक घेऊन रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वा वाद्यवृंद सुरु असेल तर गुन्हा दाखल करु असा इशारा दिला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी विशेष पथक सुध्दा नेमले आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला लगाम घालून पोलीस सामान्य नागरिकांना दिलासा देतील अशी आशा व्यक्त होत आहे. मीरा भार्इंदरमध्ये राजकारण्यांसह अनेक मंडळांनी आणि गृहसंकुलांनी नवरात्र निमित्त गरबा - दांडियाचे आयोजन केले आहे. राजकारण्यांकडून तर गरबा उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात मोठेपणा मिरवला जात आहे. ध्वनी प्रदुषणाच्या कायद्यासह उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवण्याचे काम मीरारोड आणि भाईंदरमध्ये अगदी बिनदिक्कतपणे सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलं यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. तर विद्यार्थी व नोकरदार वर्गालादेखील नाहक जाच सहन करावा लागत आहे. रात्री १० पर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी असताना देखील रात्री ११ तर काही भागात चक्क रात्री १२ पर्यंत सर्रास ध्वनीक्षेपक व वाद्यवृंद वाजवले जाते. पोलिसांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष करत आयोजकांना ११ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करण्याची अलिखीत परवानगीच दिल्याची चर्चा होती. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. लोकमतच्या शनिवारच्या हॅलो ठाणेमध्ये या बाबतचे वृत्त येताच वरिष्ठ स्तरावरुन हालचाली सुरु झाल्या. पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना दिले. सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीदेखील सर्व आयोजकांना पाचारण करुन रात्री १० नंतर आवाज केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.  

टॅग्स :garbaगरबाNavratriनवरात्रीMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस