मुंब्य्रात सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई
By Admin | Updated: May 6, 2016 00:36 IST2016-05-06T00:36:31+5:302016-05-06T00:36:31+5:30
मुंब्य्रात बुधवारी केलेल्या अभूतपूर्व कारवाईनंतर गुरूवारी सलग दुसऱ्यादिवशीही ठाणे महापालिकेने तिचा धडाका सुरूच ठेवला होता. यात जवळपास ७५० बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त

मुंब्य्रात सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई
ठाणे : मुंब्य्रात बुधवारी केलेल्या अभूतपूर्व कारवाईनंतर गुरूवारी सलग दुसऱ्यादिवशीही ठाणे महापालिकेने तिचा धडाका सुरूच ठेवला होता. यात जवळपास ७५० बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंब्य्राच्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहिलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यामध्ये जवळपास ११९६ अनिधकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही मुंब्रा बाजारपेठ, कौसा मार्केट, रशीद कंपाउंड, अमृतनगर येथील दुमजली व्यावसायिक बांधकामांसह जवळपास ७५० बांधकामे पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची पाहणी करून कारवाईची तीव्रता वाढविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. गुरूवाच्या या कारवाईमध्ये सर्व बहुमजली बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
पोलीस उपायुक्त सचिन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत सात पथकांच्या साहाय्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)