लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. सर्वत्र निर्बंध लागू असतांनाही नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यात शनिवारी एक हजार २४८ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संपूर्ण ठाणे जिल्हयात शनिवार आणि रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत शनिवारी मोटारसायकलीवरुन जाणारे १७ तर रिक्षातून चालका शेजारी प्रवाशांची वाहतूक करणाºया ५९ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच कलम १७९ अन्वये लागू केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाºया एक हजार १७२ अशा एकूण एक हजार २४८ वाहन चालकांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.*तब्बल ३८६ वाहनांवर जप्तीची कारवाई-शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पूर्णपणे निर्बंध लागू असतांनाही अत्यावश्यक कारणाशिवाय वाहने घेऊन बाहेर पडणाºया वाहन धारकांवरही वाहने जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकी - २३८, तीन चाकी - १२४ आणि मोटारकार २४ अशी ३८६ वाहने जप्त करण्यात आली. कोरोनाचे संक्र मण रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन वाहन चालकानी करावे. तसेच यापुढे होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
विकेंड लॉकडाऊन निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार २४८ वाहन चालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 21:55 IST
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. सर्वत्र निर्बंध लागू असतांनाही नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यात शनिवारी एक हजार २४८ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विकेंड लॉकडाऊन निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार २४८ वाहन चालकांवर कारवाई
ठळक मुद्दे३८६ वाहने पोलिसांनी केली जप्त