उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई

By सदानंद नाईक | Updated: May 15, 2023 18:51 IST2023-05-15T18:51:11+5:302023-05-15T18:51:20+5:30

उल्हासनगर : कॅम्प नं-५ गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जागेवरील अवैध बांधकामावर सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाने पाडकाम ...

Action on construction on Ulhasnagar Municipal Corporation plot | उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई

उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नं-५ गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जागेवरील अवैध बांधकामावर सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई केली. यावेळी विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत दिल्याने, भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर महापालिका भूखंड, भाजी मार्केट जागा, सार्वजनिक शौचालय, शाळेची जागा आदीवर अवैध बांधकामे होत आहे. गेल्या आठवड्यात इंदिरा गांधी भाजी मार्केट व साईबाबा मंदिर येथील व्यापारी गाळ्यावर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई केली. त्यानंतर कॅम्प नं-५, गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या भूखंडावर अवैध बांधकामे उभे राहिल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांना मिळाली.

त्यांनी सोमवारी दुपारी पोलीस संरक्षणात जेसीबी मशीनने अवैध बांधकाम जमीनदोस्त केले. महापालिका जागा, भूखंड यावरील अवैध बांधकामे जमीनदोस्त करण्याचा इशारा यावेळी शिंपी यांनी दिला. अतिक्रमण विभागाच्या या पाडकाम कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले असून अवैध बांधकामा वरील कारवाईचे संकेत शिंपी यांनी दिली.

Web Title: Action on construction on Ulhasnagar Municipal Corporation plot

टॅग्स :thaneठाणे