भिवंडी महापालिकेत लाचलुचपत विभागाची कारवाई; दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्तासह लिपिकास अटक
By नितीन पंडित | Updated: January 3, 2024 16:34 IST2024-01-03T16:33:42+5:302024-01-03T16:34:11+5:30
या घटनेने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडी महापालिकेत लाचलुचपत विभागाची कारवाई; दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्तासह लिपिकास अटक
भिवंडी: मालमत्तेवर कर लावण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मनपाच्या करमूल्यांकन विभागाच्या प्र.सहाय्यक आयुक्तांसह लिपिकास लाच लुचवत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली आहे. या घटनेने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कर मूल्यांकन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव व प्रभारी लिपिक किशोर केणे असे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शहरातील एका मालमत्ता धारकास मालमत्तेवर कर लावण्यासाठी सुदाम जाधव यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती.
या प्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. अखेर बुधवारी सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कर मूल्यांकन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त व लिपिक केणे यांना रंगेहात अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.