शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या गटई स्टॉल्सवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 12:47 IST

चर्मकारांनी ठामपासमोर केले धरणे आंदोलन

ठाणे: सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे महानगर पालिकेने चप्पल शिवणार्‍यांच्या गटई स्टॉल्सवरही कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्यात समाजकल्याण खात्याने सुमारे 265 जणांना स्टॉल्स प्रमाणित केले असतानाही ही कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ  संत रवीदास गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. 

ठाणे महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. समाजकल्याण खात्याने ठाण्यातील 265 गटई स्टॉल्सला प्रमाणित केले असून त्या संदर्भात ठाणे महानगर पालिकेला जिल्हाधिकार्‍यांनी अवगत केले आहे. तरीही 2015 मध्ये या गटई स्टॉल्सवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने गटई कामगारांनी त्यावेळी उपोषणाचा मार्ग अनुसरला होता. त्यावेळी गटई कामगार आणि ठामपा अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये समाजकल्याण प्रमाणित केलेल्या स्टॉल्सवर कारवाई करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. तरीही, स्टॉल्सवर कारवाई केली जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनामध्ये सुमारे 200 ते 250 चर्मकार बांधव सहभागी झाले होते. रोजगार आामच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा; परत करा, परत करा.. आमचे स्टॉल्स परत करा, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. 

दरम्यान,  ठाणे शहरात समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सवरील कारवाई रद्द करण्यात यावी;  समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेले स्टॉल्स ठामपाने जप्त केले आहेत. ते तत्काळ परत करण्यात यावेत;  गटई स्टॉल्सचा समावेश फेरीवाल्यांमध्ये करु नये/बैठा व्यवसाय करणार्‍या चर्मकारांना पिच (बैठा) परवाना द्यावा;  समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सला ठामपाने करआकारणी करावी;  समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सची कागदपत्रे तपासून त्यांनाही ठामपाकडून मंजूरी द्यावी, अशा मागण्या राजाभाऊ चव्हाण यांनी केल्या. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका