शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’ची ७ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ठाण्यातील मॉलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:36 IST

पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा घडवल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदींशी संबंधित ठाण्यातील एका मॉलमधील सात कोटींच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली.

ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा घडवल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदींशी संबंधित ठाण्यातील एका मॉलमधील सात कोटींच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. यात ‘जिली’ या हिºयाच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काउंटरवर छापे मारून ते रात्री उशिरा सीलबंद केले.अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्यासह आठ जणांच्या पथकाने तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या अधिका-यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आधी विवियाना मॉलच्या तळ मजल्यावरील ‘जिली’ या हिºयाच्या दागिन्यांच्या ‘शॉपर्स स्टॉप’मधील शोरूमच्या काउंटरचा ताबा घेतला. या काउंटरवरच काही प्रतिष्ठित पंचांना पाचारण करून त्यांनी तिथे असलेल्या कर्मचाºयांकडून कागदपत्रांची आणि दागिन्यांची तपासणी सुरू केली. ती सुरूअसतानाच चंदा यांच्या दुसºया चार जणांच्या पथकाने ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘जिली’च्या मुख्य दुकानावरही धाड टाकली. अचानक सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे सुरुवातीला या दुकानातील कर्मचारी पूर्णपणे गोंधळले होते. मालक नसल्यामुळे आमच्याकडे काहीच माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, आम्ही ‘ईडी’ डिपार्टमेंट आणि पंजाब नॅशनल बँकेतून आलो आहोत. आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा’, असे आवाहन ओळखपत्र दाखवून या अधिकाºयांनी केल्यानंतर याठिकाणीही काही पंचांना बोलावून प्रत्येक काउंटर आणि दागिन्यांची माहिती घेऊन त्यांची नोंद करण्यात आली. गुरुवारी रात्री १२.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. संपूर्ण दागिने, रोकड आणि कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर या दोन्ही दुकानांना रीतसर सील करण्यात आले. यापुढे ही दुकाने पुढील कारवाई होईपर्यंत बंद राहतील असेही या अधिकाºयांनी दोन्ही दुकानांतील कर्मचाºयांना बजावले.‘जिली’मध्ये चार कोटींची, तर ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काउंटरमध्ये तीन कोटींची मालमत्ता असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता केवळ ही दुकाने सीलबंद करण्याची कारवाई झाली असून येत्या तीन ते चार दिवसात दोन्ही दुकानांतील ऐवजाच्या मूल्यांकनाचे काम केले जाणार असल्याची माहिती ईडीच्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.मेहुल चोकसीची मालमत्ताठाण्यातील सीलबंद केलेली गिली आणि शॉपर्स स्टॉपमधील काउंटर्स ही दोन्ही दुकाने नीरव मोदीचा भागीदार मेहुल चोकसीची असून त्यांना वित्तीय पुरवठा करताना कोणत्या बँक अधिकाºयाने मदत केली, याचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती या अधिकाºयाने दिली.चार वेगवेगळ्या पथकांकडून सहायक संचालक दर्जाच्या अधिकाºयांच्या अधिपत्याखाली ठाण्यातील त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात येत आहे. ठाण्यातील मालमत्ता ३० ते ४० कोटींच्या घरात असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा