शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळ बंदची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 22:06 IST

ठाणे जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे.

सुरेश लोखंडे/ ठाणे : जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. यातील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देऊन त्याच्या येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था न केल्यामुळे जिल्ह्यातील गावखेड्यतील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. यामुळे गावक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा कमी विद्यार्थी संख्ये अभावी बंद करण्याची कारवाई शिक्षण विभागाव्दारे करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद व पाचही पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे रणशिंगही फुंकण्यात आले आहेत. त्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. यानुसार अंबरनाथ तालुक्यातील बोराडपाडा परिसरातील सिंधीपाडा, वा-याचा पाडा, लव्हाळी येतील तीन शाळा दोन दिवसांपूर्वीच बंद केल्या आहेत. या शाळांवरील शिक्षकाना आता अंबरनाथ पंचायत समितीमध्ये काम देण्यात आले. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये प्रवेश न करता व त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था न करता त्यांना वाºयावर सोडून देण्यात आल्यामुळे या गावांमधील पालकांकडून सांगितले जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सुमारे १८ शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये आस्नोली बारवीडॅम, शिंदीपाडा, वाडी, भिनारपाडा, कातकरीवाडी, दात्रयाचीवाडी, भेंडीपाडा, साई, सावरोली, कोपºयाचीवाडी, पादीरपाडा, उमरोली, बांधनवाडी, डोणे या शाळां बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यातील सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. या शाळांचे सुमारे २१ शिक्षकाना त्यांची दैनंदिन हजेरी अंबरनाथ पंचायत समितीवर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. जिल्ह्यात केवळ दहा शाळा बंद करण्याची कारवाई झाल्याचे शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी पत्रकाराना सांगितले होते. मात्र अंबनाथ तालुक्यातच १८ शाळा बंद होत असून उर्वरित चार तालुक्यात अशा सुमारे कितीतरी शाळा बंद होत असल्याचे निदर्शनात आले आहे. यावरून शिक्षण विभागाकडून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा आहे.

सुमारे वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. यामध्ये एक ते पाच विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांसह सहा ते दहा, ११ ते १५ आणि १६ ते २० विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा समावेश आहे. मात्र या शाळा बंद करण्यापूर्वी त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या म्हणजे एक किमी. परिसरातील शाळांमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. याशिवाय त्याना येजा करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे अपेक्षित आहेत. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडण्यात आल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा बंद करण्यासाठी प्रथम संबंधीत ग्राम पंचायतीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे अपेक्षित आहे. परंतु तसे ठराव नसतानाही शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येत असल्यामुळे गावकरी व प्रशासन यांच्यात कोणत्याही क्षणी तीव्र संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता आहे. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. शासन आदेशानुसार या शाळा बंद केल्या जात असून त्यांचा आढावा लवकरच घेण्यात येईल. मात्र या शाळेच्या विद्यार्थ्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येत आहे.- विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. ठाणे

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका