उल्हासनगरचे विद्रुपीकरण करणाऱ्या पोस्टर्सवर कारवाई, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: March 25, 2023 19:09 IST2023-03-25T19:00:22+5:302023-03-25T19:09:57+5:30
उल्हासनगरातील विविध भागात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स व जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे.

उल्हासनगरचे विद्रुपीकरण करणाऱ्या पोस्टर्सवर कारवाई, गुन्हा दाखल
उल्हासनगर : शहराला विद्रुपीकरण करणाऱ्या विनापरवाना जाहिरात व पोस्टर्सवर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली. विठ्ठलवाडी व मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोस्टर्स लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील विविध भागात विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स व जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिका अतिक्रमण विभागाने अश्या विनापरवाना लावण्यात आलेल्या पोस्टर्स व बॅनर्सवर कारवाई करून काढून टाकण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली. दरम्यान छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल व कॅम्प नं-३ परिसरात विनापरवाना पोस्टर्स लावल्या प्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून भोजने नावाच्या इसमा विरोधात तर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमा विरोधात विनापरवाना पोस्टर्स लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. शहारतील विविध विभागात अवैध व विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स व जाहिराती लावल्यास कारवाई करण्याचे संकेत महापालिका अधिकारी शिंपी यांनी दिले.
दरम्यान महापालिका अतिक्रमण विभागाने नेताजी चौकसह इतर परिसरात रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमण करून साहित्य विक्रीला ठेवणाऱ्या विरोधातही शुक्रवारी कारवाई केली. फुटपाथवरील साहित्य जप्त केले असून एकाच दिवसी दुकानदारा कडून ३० हजाराचा दंडही वसूल केला. अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली. मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे शिंपी यांनी सांगितले.