भिवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार तरूणावर पॉस्को अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:28 IST2018-12-11T22:25:22+5:302018-12-11T22:28:20+5:30
भिवंडी : शहरातील कल्याणरोड येथील नेहरूनगर भागात रहाणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला आपल्या घरांत बोलावून तीच्यावर अत्याचार करणा-या १९ वर्षाच्या ...

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार तरूणावर पॉस्को अंतर्गत कारवाई
भिवंडी: शहरातील कल्याणरोड येथील नेहरूनगर भागात रहाणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला आपल्या घरांत बोलावून तीच्यावर अत्याचार करणा-या १९ वर्षाच्या तरूणास पोलीसांनी अटक करून त्याच्यावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणरोड येथील नवीवस्ती नेहरूनगर येथे रहाणारी चार वर्षाची मुलगी काल सोमवार रोजी सकाळी घराजवळील मैदानात खेळत होती. तीला परिसरांत रहाणाºया तौहीद रेहमान शेख(१९)या मुलाने आपल्या घरांत बोलाविले आणि तीच्यावर अत्याचार केला. ही घटना मुलीने आपल्या आईस सांगीतली असता आईने अत्याचारी तरूणा विरोधात शहर पोलीस ठाण्यात तौहिदच्या विरोधात तक्रार केली. दरम्यानच्या काळात तो नेहरूनगर परिसरांतून पळून गेला होता. त्यास पोलीसांनी आज मंगळवार रोजी सायंकाळी पकडून अटक केली आहे.शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असुन त्याला बुधवारी भिवंडी कोर्टात हजर करणार असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगीतले. या घटने बाबत पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक हानिफ शेख हे करीत आहेत.