चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST2021-05-28T04:29:17+5:302021-05-28T04:29:17+5:30

डोंबिवली : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला कल्याण पूर्वेतून आठवडाभरातच अटक करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत ...

Accused of theft arrested | चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

डोंबिवली : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला कल्याण पूर्वेतून आठवडाभरातच अटक करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पूर्वेकडील अयोध्यानगरी परिसरातील कुश बिल्डिंगमध्ये राहणारे चंद्रशेखर लिंगायत यांच्या घरातून ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना १९ मे रोजी दुपारी सव्वा ते पावणे दोनच्या दरम्यान घडली होती. लिंगायत यांनी त्यांच्याकडे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या सतीश साळे याच्यावर संशय व्यक्त केला होता. टिळकनगर पोलीस ठाण्यात साळेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा छडा तातडीने लावण्यात पोलिसांना यश आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस कडलग, उपनिरीक्षक एन. टी. वाघमोडे, हवालदार श्याम सोनावणे, पोलीस नाईक गोरखनाथ घुगे, दीपक भावसार, कृष्णा दुमाडा यांच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत आरोपी साळेची माहिती मिळविली आणि तो राहत असलेल्या कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ४० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. अधिक तपास पोलीस हवालदार सोनावणे करीत आहेत.

------------------------------------------------------

वाचली.

Web Title: Accused of theft arrested