लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया मंगेश कांबळे उर्फ पठाण (३५) याला ठाणे सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी दहा वर्षे सक्त मजूरी तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.मीरा रोड पूर्व भागातील एनजी वूड पार्क इमारतीच्या तळमजल्यावर तसेच कांदीवली पूर्व भागातील क्रांतीनगर येथे १९ सप्टेंबर २०१५ रोजी मंगेश याने या पिडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली १९ सप्टेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणामध्ये मंगेश कांबळे याला नवघर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी १८ मार्च २०२१ रोजी ठाणे न्यायालयात झाली. त्यावेळी पिडित मुलीसह सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षां चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी पुरावे ग्राहय धरुन आरोपी मंगेश याला कलम ३७६, ३५४-अ आणि पोस्को कायद्यांतर्गत दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साध्या कैदेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. यातील दंडाची रक्कम ही पिडितेला नुकसानभरपाई पोटी कलम ३५७ अंतर्गत देण्याचे आदेशही ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजूरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 22:05 IST
एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया मंगेश कांबळे उर्फ पठाण (३५) याला ठाणे सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी दहा वर्षे सक्त मजूरी तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजूरीची शिक्षा
ठळक मुद्दे ठाणे विशेष न्यायालयाचा आदेश