अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीला  वीस वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: June 23, 2025 22:09 IST2025-06-23T22:09:18+5:302025-06-23T22:09:50+5:30

ठाणे न्यायालयाचे आदेश : २० हजारांच्या दंडाचीही शिक्षा

accused of assault minor girl sentenced to 20 years of hard labour | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीला  वीस वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीला  वीस वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अभिषेक जयस्वाल (वय २४) याला ठाणे पॉक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा साेमवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा आराेपीला भाेगावी लागणार आहे.

मुंब्रा भागात राहणाऱ्या १५ वर्षीय पीडित मुलीला त्याच भागात राहणारा आराेपी अभिषेक छेड काढत असे. लाेकांच्या मागणीनुसार, १ नोव्हेंबर २०२२ रोजी तो त्याच भागात पाण्याचा टँकर घेऊन आला हाेता. पाणीपुरवठा केल्यानंतर पीडित मुलीला खोटे सांगून त्याने टँकरमध्ये बसून एकांत ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर त्याने अत्याचार केले. मुलीने घरी आल्यानंतर रडतच अत्याचाराचा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. तिने अभिषेकविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला हाेता.

या खटल्याची सुनावणी २३ जून राेजी विशेष पॉक्सो न्यायाधीश डी.एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर भक्कमपणे सादर केल्या. त्याच पुराव्याच्या आधारे न्या.देशमुख यांनी अभिषेकला दोषी ठरवून २० वर्षांच्या सक्त मजुरीसह २० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: accused of assault minor girl sentenced to 20 years of hard labour