उल्हासनगरात खुनाचे आरोपी ४८ तासांत गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST2021-09-04T04:47:49+5:302021-09-04T04:47:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील तलावात गळा चिरलेल्या एका इसमाचा मृतदेह ३० ...

Accused of murder in Ulhasnagar disappears in 48 hours | उल्हासनगरात खुनाचे आरोपी ४८ तासांत गजाआड

उल्हासनगरात खुनाचे आरोपी ४८ तासांत गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील तलावात गळा चिरलेल्या एका इसमाचा मृतदेह ३० ऑगस्ट रोजी मिळाला होता. पोलिसांनी टॅटू व गोंदलेल्या ‘चंदू’ नावावरून खून झालेल्या इसमाचे नाव, पत्ता शोधून दोन आरोपींना अवघ्या ४८ तासांत अटक केली. पत्नीच्या तक्रारीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील स्मशानभूमीच्या तलावात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी गळा चिरलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळाला. मृतदेहाच्या हातावर टॅटू व चंदू नाव गोंदलेले होते. विठ्ठलवाडी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवून चौकशीची सूत्रे हलविली. दरम्यान, नवी मुंबईच्या रबाडे पोलीस ठाण्यात चंद्रकांत शेलार या नावाचा इसम हरविल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांनी चंद्रकांत शेलार यांची पत्नी मीना यांच्याशी संपर्क साधला असता, तिने मृतदेह चंद्रकांत शेलार यांचा असल्याची माहिती दिली. घणसोली येथे नाका कामगार असलेल्या चंद्रकांत शेलार यांचा क्षुल्लक कारणावरून घणसोली परिसरात राहणाऱ्या साजन कांबळे आणि डिव्हाईन तेलेस गोन्सालवीस यांनी खून केल्याचे उघड झाले.

विठ्ठलवाडी पोलिसांनी मीना शेलार यांच्या तक्रारीवरून साजन कांबळे व डिव्हाईन गोन्सालवीस यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या ४८ तासांत आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेलाल थोरात यांनी दिली.

Web Title: Accused of murder in Ulhasnagar disappears in 48 hours