लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुनिलकुमार जयस्वाल (२४, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला एक वर्ष दहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी सुनावली. तसेच पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक आठवडा अतिरिक्त कैदेचीही शिक्षा सुनावली आहे.कोपरीतील एका अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करुन तसेच तिचा पाठलाग करुन सुनिलकुमार हा तिचा विनयभंग करीत होता. हा प्रकार ७ जून २०१६ रोजी सकाळी ८ ते ११ जून २०१६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडला होता. याच प्रकरणात कोपरी पोलिसांनी त्याला मोठया शिताफीने अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात २२ फेब्रुवारी रोजी झाली. यामध्ये सरकारी वकील म्हणून उज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. सर्व बाजूंची पडताळणी झाल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून त्याला एक वर्ष दहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष दहा महिने कैदेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:33 IST
एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुनिलकुमार जयस्वाल (२४, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला एक वर्ष दहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी सुनावली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष दहा महिने कैदेची शिक्षा
ठळक मुद्दे ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश