विलगीकरण केंद्रातून आरोपींनी केले पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:56 IST2020-08-08T00:55:53+5:302020-08-08T00:56:20+5:30

हिललाइन पोलिसांनी एका गुन्ह्यात कुणाल पटेल व मुकेश जगताप यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची कोरोना चाचणी केली.

The accused escaped from the separation center | विलगीकरण केंद्रातून आरोपींनी केले पलायन

विलगीकरण केंद्रातून आरोपींनी केले पलायन

उल्हासनगर : न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन कोरोनाबाधित आरोपींनी टेऊराम हॉल विलगीकरण केंद्रातून बुधवारी दुपारी २ वाजता पलायन केले. या प्रकाराने खळबळ उडाली असून हिललाइन पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हिललाइन पोलिसांनी एका गुन्ह्यात कुणाल पटेल व मुकेश जगताप यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची कोरोना चाचणी केली. दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर महापालिकेने उभारलेल्या कॅम्प नं-५ येथील टेऊराम हॉलमधील विलगीकरण केंद्रात उपचारासाठी पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. बुधवारी दुपारी २ च्या दरम्यान जेवणासाठी त्यांच्या हातातील बेड्या पोलिसांनी काढून टाकल्या. त्यांनी ही संधी साधून टेऊराम हॉलच्या मागच्या भिंतीवरून नाल्यात उडी टाकून धूम ठोकली. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आरोपींनी पलायन केल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: The accused escaped from the separation center