लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोटारसायकल आणि मोबाइलचोरी करणा-या सचिन विनायक मोरे (२०, रा. हावरे सिटी रोड, ठाणे) या अट्टल चोरट्याला कासारवडवली पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून ३० हजारांची एक मोटारसायकल आणि २५ हजारांचा मोबाइल असा ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मोटारसायकल आणि मोबाइलचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी आपल्या पथकाला अशा चोरट्यांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर ६ आॅक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. जाधव, उपनिरीक्षक के.व्ही. मोरे, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, अंकुश पाटील, सुजित खरात, पोलीस नाईक विश्वनाथ धुर्वे, विजय जाधव आणि राजकुमार महापुरे आदींचे पथक आनंदनगर, हावरे सिटी, ज्ञानगंगा कॉलेज परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी हावरे सिटीकडे जाणा-या परिसरात एक मोटारसायकलस्वार संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळले. या पथकाने त्याची चौकशी केल्यानंतर सचिन मोरे अशी त्याने स्वत:ची ओळख सांगत पाचआंबा कैलास मित्र मंडळाच्या जवळ हावरे सिटी रोड, ठाणे येथे वास्तव्याला असल्याचे सांगितले. त्याच्याकडील वाहनाची कागदपत्रे त्याच्याकडे उपलब्ध नव्हती. मोटारसायकलच्या मालकीबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता, त्याने ही मोटारसायकल कासारवडवली परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडील मोबाइलही चोरीचाच असल्याचे उघड झाले. त्याला १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मोबाइलसह मोटारसायकलची चोरी करणा-या अट्टल चोरटयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:56 IST
चोरीची मोटारसायकल आणि मोबाइल घेऊन पलायनाच्या तयारीत असलेल्या एका अट्टल चोरटयाला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलसह मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली आहे.
मोबाइलसह मोटारसायकलची चोरी करणा-या अट्टल चोरटयास अटक
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांनी केली कारवाई गस्तीच्या वेळी ठेवली पाळत चोरीची मोटारसायकल आणि मोबाइल हस्तगत