आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात, प्रवाशाचा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:49 IST2020-07-28T18:39:27+5:302020-07-28T18:49:37+5:30
आणि तो ट्रेनखाली ओढला जाणार तेवढ्यात स्थानकात असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला सुखरूप बाहेर खेचल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी घडली.

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात, प्रवाशाचा वाचला जीव
डोंबिवली: कामयानी एक्स्प्रेस ने प्रवासाला जाण्याच्या तयारीत असलेला दिलीप मांगडे हा प्रवासी चुकून पवन एक्स्प्रेसमध्ये चढला, तेव्हा त्यास काय करावे न सुचल्याने त्याने चालत्या ट्रेनमधून खाली फलाटात उडी मारली, परंतु ती उडी गाडी जाण्याच्या विरुद्ध दिशेला मारली गेल्याने त्याचा तोल गेला, आणि तो ट्रेनखाली ओढला जाणार तेवढ्यात स्थानकात असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला सुखरूप बाहेर खेचल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी घडली.
सोमनाथ महाजन आणि के साहू असे त्या प्रसंगावधान राखलेल्या जवानांची नाव असून त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. त्या घटनंतर दिलीपला स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. तेथे त्याच्या तब्येतीची विचारपूस आणि पाहणी केल्यानंतर त्याने पुढील प्रवास केल्याचे सांगण्यात आले. प्रवाशाचे जीव वाचवणार्या दोन्ही जवानांचे कौतुक होत असून वरिष्ठांनी ही बाब विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याचे सांगण्यात आले. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल।झाला असून प्रवाशांनी रेल्वे प्रवासात सतर्क राहण्याची नितांत गरज असल्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले.