शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अपघात , आत्महत्या कि हत्या ? महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गुढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 20:54 IST

भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला .  प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा  संशय व्यक्त होत आहे . 

मीरारोड - भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला .  प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा  संशय व्यक्त होत आहे .  रेल्वे पोलिसांनी , लोकलच्या धडकेने तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे . तर मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र  प्रेमप्रकरणातून तिची हत्या  झाल्याचा आरोप केलाय . 

विलेपार्ले महामार्गा जवळील संभाजी नगर मध्ये राहणारी  शिल्पा यडलम पुट्टा ( 20 ) हिचा मृतदेह भाईंदर रेल्वे स्थानक जवळच्या वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री साडे आकाराच्या सुमारास आढळून आला .  

शिल्पा हि कला शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होती . तिच्या वडिलांना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास तिने फोन केला होता . एका मुलाशी आपले प्रेम असल्याचे तिने सांगितले होते . त्यावर वडिलांनी तू घरी ये , तुमचं लग्न लाऊन देऊ असे सांगितल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे होते . प्रेमप्रकरणातूनच आपल्या मुलीची हत्या करण्यात आली आहे . तिने जेव्हा कॉल केला तेव्हा आजूबाजूला मुलांचा आवाज येत होता असे कुटुंबीयांनी म्हटले . 

रेल्वे रुळावरून तिला उचलून आणत असताना तिच्यात जीव होता . तिच्या फक्त डोक्यालाच जखम आहे . व तिचा मोबाईल देखील तिच्या हातातच होता असे तिला उचलून आणणाऱ्यांनी सांगितल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात . 

तर विरार कडे जाणाऱ्या लोकल च्या धडकेत ती मरण पावली . शिल्पा हि रेल्वे रुळावरून चालली होती व  सतत हॉर्न वाजवून देखील ती बाजूला झाली नाही असे लोकलच्या चालकाने भाईंदर रेल्वे पोलिसांना कळवले होते असे वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले . 

पालकांच्या मागणी नुसार शिल्पाचा मृतदेह मुंबईच्या जे . जे . रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे . अकस्मात मृत्यूची नोंद केली असून चौकशी सुरु आहे असे ते म्हणाले . दरम्यान लोकल चालकाने दिलेली माहिती तसेच शिल्पाने प्रेम प्रकरण वा प्रेम विवाह वरून आत्महत्या केल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Deathमृत्यूMira Bhayanderमीरा-भाईंदरCrimeगुन्हाnewsबातम्या