शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

औष्णिक केंद्रातील राख नेणाऱ्या डंपरचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:09 PM

स्थानिक संतप्त; वाहनातून पडलेल्या राखेने पर्यावरणाची हानी होण्याची भीती

डहाणू/बोर्डी : येथील अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रातून निर्माण होणाºया राखेची डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्गावरून डंपरद्वारे गुजरातला वाहतूक केली जाते. अशाच एका डंपरचा सोमवारी रात्री अपघात झाला.ओव्हरलोड झालेला हा डंपर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास चिखले पोलीसचौकी समोर अपघातग्रस्त होऊन त्यातील राख जमिनीवर पसरली होती. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर घोलवड पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पहाटेपर्यंत जेसीबीद्वारे राख भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या बाबत कलम १८४ अन्वये बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिकारी प्रकाश सोनावणे यांनी दिली. याबाबत अदाणी डहाणू औष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.अदाणी डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हे देशातील महत्त्वाचे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. येथे निर्माण होणाºया राखेची गुजरातच्या दिशेने वाहतूक केली जाते. प्रतिदिन राख घेऊन जाणाºया अनेक वाहनांतून नगर परिषद क्षेत्रातील डहाणू शहर, तारपा चौक, बस आगार, मासोली, पारनाका, आगर तर ग्रामीण भागातील नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि झाई या गावांमध्ये राख पडलेली दिसते. हा परिसर समुद्रकिनाºयालगत असल्याने रस्त्यावर पसरलेली ही राख भरती काळात जोराचे वारे वाहू लागल्यावर हवेत मिसळते. त्यामुळे श्वसनाद्वारे ती डोळे तसेच नाका-तोंडात जाऊन जळजळ, खोकला आदीचा त्रास होऊ शकतो. अनेकदा राखेने भरलेले वाहन रस्त्यावरून जाताना गतिरोधक वा खड्ड्यातून गेल्यास त्यातून राख बाहेर येऊन त्याच्या कणांमुळे चालकाला त्रास होतो.डहाणू ते झाई या दरम्यान ठराविक अंतरावर हे राखेने भरलेले डंपर थांबविलेले असतात. त्यामुळे स्थानिकांकडून अपघाताची भीती व्यक्त होते. तर ही राख पडून परिसरात पसरत असल्याने पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे.