मित्राच्या पत्नीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By धीरज परब | Updated: November 28, 2023 19:41 IST2023-11-28T19:40:51+5:302023-11-28T19:41:39+5:30

काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला व त्या रात्री आरोपीला अटक केली.

Abuse of friend's wife by luring her into marriage | मित्राच्या पत्नीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

मित्राच्या पत्नीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

मीरारोड - मित्राच्या पत्नीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करणाऱ्यास काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता यांचे पती व  ३६ वर्षीय आरोपी, हा एकाच व्यवसायातील असल्याने दोघेही मित्र आहेत. त्यामुळे आरोपीची पीडितेशी ओळख होती. त्याने महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध राहत्या घरी, लॉजमध्ये ठेवले.

पतीला ह्या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्याने पत्नीशी संबंध तोडले. आरोपीने तिला तिच्या मुलांसह लॉज मध्ये ठेवले. तेव्हा सुद्धा लग्नाचे आमिष आणि मुलांसह सांभाळ करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर मात्र आरोपीने आपण लग्न करणार नाही, तू तुझे बघ असे सांगून तिला धमकी दिली. २६ नोव्हेंबर रोजी पीडितेच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला व त्या रात्री आरोपीला अटक केली.

Web Title: Abuse of friend's wife by luring her into marriage