शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ड्युटीला गैरहजर; कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:58 IST

निवडणूक ड्युटीला गैरहजर;  कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार

ठाणे, कल्याण : ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध महापालिका प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यातही तीन दिवस घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराला ४ हजार ८०० कर्मचारी गैरहजर होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार गैरहजर अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, नोटीस मिळाल्यानंतरही जे अधिकारी कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित राहणे, हा केवळ शिस्तभंग नसून निवडणूक कायद्याचा गंभीर भंग असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. पालिकेच्या वतीने २७, २८ व २९ डिसेंबर रोजी पहिले प्रशिक्षण दोन सत्रांत झाले. मात्र, या शिबिराला कर्मचारी गैरहजर राहिले होते. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २०१३ मतदान केंद्रावर एकूण १२ हजार ६५०  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. 

केडीएमसी प्रशासनाने उचलले कठोर पाऊलकल्याण : केडीएमसीची निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र काही कर्मचारी, अधिकारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत, अशा २८ कर्मचारी, अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

निवडणूक कर्तव्यावर अजूनही काही कर्मचारी हजर झालेले नाहीतनिवडणूक कर्तव्यावर अद्यापही हजर न झालेले, प्रामुख्याने व्ही एसटी, एफएसटी, एसएसटी या पथकांतील अधिकारी, कर्मचारी आणि झोनल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सहायक आयुक्त संदीप रोकडे यांना दिले आहेत. २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

कर्तव्यावर हजर होण्याची एक संधीमतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना कर्तव्यावर हजर होण्याची एक संधी देण्यात आली आहे. हे कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा आयुक्त गोयल यांनी दिला आहे.

सुट्टीनिमित्त कर्मचारी गेले फिरायलानाताळच्या निमित्ताने या शाळांना सुट्ट्या आहेत. परिणामी तेथील अनेक कर्मचारी हे सुट्टीच्या निमित्ताने फिरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यात १५ डिसेंबरला पालिका निवडणुका जाहीर झाल्या; पण तत्पूर्वीच अनेक कर्मचाऱ्यांनी डिसेंबरच्या शेवटी बाहेर फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन केले होते. 

२८५ कर्मचाऱ्यांना नोटिसाभिवंडी : निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित २८५ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी ४,५०० कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी मंगळवारी प्रशिक्षण घेण्यात आले होते. यावेळी मतदान केंद्रप्रमुख असलेल्या ७४ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

२०१३ मतदान केंद्रावर एकूण १२ हजार ६५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी या नेमणुका केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Absent Election Duty: Strict Action, Notices Issued, Crimes to Be Filed

Web Summary : Absent election duty staff face strict action. Notices issued in Thane, crimes to be filed in Kalyan for unauthorized absence from election training and duty. Staff given final chance before legal action.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका