शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

‘त्या’ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरहजेरी गरिबांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:01 AM

डॉक्टर, परिचारिकांची अनुपस्थिती; मुख्यालयी न राहणाऱ्यांवर होणार कारवाई

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि उपकेंद्रात सुसज्ज निवासस्थाने निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असताना तसेच कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आले आहे. डॉक्टर, परिचारिकांच्या गैरहजेरीचा फटका गरीब रुग्णांना बसत असल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे प्रथम सर्वांनी मुख्यालयी राहण्याबाबत अंमलबजावणी करावी आणि नंतरच आरोग्य समितीची सभा लावावी, असे आदेश उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती नीलेश सांबरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.जिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३१२ उपकेंद्रे आहेत. जि.प.अंतर्गत एकूण १४ लाख २८ हजार ६७८ लोकसंख्येला आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. दररोज साधारणपणे आरोग्य केंद्रात ५० हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी नोंद करीत आहेत. जि.प.च्या आरोग्य विभागांतर्गत एकूण १७१२ मंजूर पदांपैकी १२१५ पदे भरण्यात आली असून ४९७ पदे रिक्त आहेत. त्यापैकी सहाय्यक जिल्हा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पुरुष व महिला आरोग्य सेवक, स्त्री परिचर आदी रुग्णसेवेशी निगडित पदांचा समावेश आहे. त्यामुळे या रिक्त पदांचा मोठा परिणाम विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आदी ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णसेवेवर होत असल्याने उपचाराविना अनेक रुग्णांचे मृत्यू होत असतात. त्यामुळे सर्वांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र गैरहजर राहणाºया अधिकारी-कर्मचाºयांमुळे गरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने इथल्या रुग्णांना नाईलाजाने गुजरात आणि सिल्वासा येथे जाऊन उपचार करून घ्यावे लागत आहेत.राज्य आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना जि.प.मार्फ$त राबविण्यात येत आहेत. या सेवा राज्यातील जनतेला विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जि.प.मध्ये नियुक्त केल्या जाणाºया वर्ग क्र. ३ च्या कर्मचाºयांना देण्यात येणाºया सेवा लक्षात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाºयांनी मुख्यालयी राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुख्यालयी राहण्यासाठी २० कोटींचा खर्च त्यांच्या निवासस्थानांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी करण्यात आलेला आहे. अशा वेळी सूर्यमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर तर परिचारिका खोडाळा येथे कार्यरत आहेत. त्यातच कारेगाव प्राथमिक केंद्रातील परिचारिका कुठलाही रजेचा अर्ज न देता गैरहजर आहेत. भोपोली, सवादे, गडदे, शेवते व आलोंडा उपकेंद्रांमध्ये परिचारिका राहात नसल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे उपाध्यक्ष सांबरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या निदर्शनास पत्रान्वये आणून दिले आहे.तत्काळ हजर राहण्याचे आदेश द्या, नंतरच आरोग्य समितीची सभा घ्याजिल्ह्यात सध्या कोविड, कुपोषण, सर्पदंश, साथीचे आजार याचे प्रमाण वाढू लागल्याने ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे अत्यावश्यक असताना त्यांची गैरहजेरी गरीब रुग्णांच्या जीवितास धोका उत्पन्न करू शकते. त्यामुळे आपल्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाºयांना तत्काळ मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश द्यावेत. नंतरच आरोग्य सेवेची सभा घेण्यात येईल, असे कळवून मंगळवारी आयोजित सभा रद्द करण्याचे पत्र उपाध्यक्षांनी जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. दयानंद सूर्यवंशी यांना पाठविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या