शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

ठाण्यात वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी १०० चार्जींग स्टेशनची शोध मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 3:05 PM

वीजेवर धावणाऱ्या वाहनांच्या सामंज्यस करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता ठाणे महापालिका आणि संबधींत संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकमीत कमी जागेत चार्जींग स्टेशन उभारण्याचा मानसजानेवारीत सुरु होणार प्रकल्प

ठाणे - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात वीजेवर धावणाऱ्या वाहनांची मोहीम जोरात सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी पालिकेने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता या चार्जींग स्टेशनची शोध मोहीम पालिकेने सुरु केली आहे. या प्रक्रियेमुळे चार्जींग स्टेशन उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.                    देशभरात २०३० पर्यंत वीजेवरील वाहनांची वाहतूक सुरु करण्याचे धोरण केंद्र शासनाने आखले असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात अशा वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या निधीतून शहरात १०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार होती. मात्र, महिंद्रा आणि कायनेटीक ग्रीन या कंपन्यांनी स्टेशन उभारणीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे महापालिका निधीतून चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळला असून महापालिका प्रशासन आता संबंधित कंपन्यांना चार्जींग स्टेशन उभारणीसाठी केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून शहरात वीजेवरील वाहन उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही महापालिका करणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर आयुक्त जयस्वाल यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवार आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.                  त्यानंतर जानेवार पर्यंत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता शहराच्या विविध भागात चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या शहरातील पेट्रोल पंप असो किंवा सीएनजी स्टेशन असो या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या की वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. परंतु चार्जींग स्टेशन उभारतांना मात्र याची काळजी घेतली जाणार आहे. रस्त्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार अशा जागांचा शोध सध्या पालिकेने सुरु केला आहे. यासाठी पालिकेचे काही भुखंड यासाठी देता येऊ शकतात का? याचाही चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान शहराच्या कोण कोणत्या भागात कीती चार्जींग स्टेशन असणार हे सुध्दा आता सर्व्हे नंतरच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन