शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सार्वजनिक वाहतूक करणार सक्षम - पालकमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:51 AM

जनतेची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांसह सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याचे सुतोवाच नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

ठाणे : जिल्ह्यातील जनतेची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांसह सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याचे सुतोवाच नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.जिल्हा नियोजन भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, आमदारही यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम राहिल्यास, वेळेवर उपलब्ध झाल्यास लोक त्यांची वाहने रस्त्यावर आणणार नाही. सार्वजनिक सेवेचा लाभ घेतील. यामुळे जिल्ह्यात कोठेही वाहतूककोंडी होणार नाही. यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यावर भर देण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेतले जातील. यामध्ये महापालिकांच्या परिवहन सेवाही सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.जिल्हा विकास आराखड्यास अनुसरून ते म्हणाले की जिल्ह्याच्या विकासास अनुसरून जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपाययोजना, विशेष घटन योजना आदींच्या जिल्हा वार्षिक प्रारूप विकास आराखड्यावर डीपीसीत झालेल्या चर्चेस अनुसरूनदेखील शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली.दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाईगेल्या आर्थिक वर्षातील निधीचा खर्च न करणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. तर जिल्ह्यात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. त्यांच्या निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे अधिकाºयांनी नमूद केल्याचे शिंदे यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या डीपीसीला उपस्थित नसलेल्या अधिकाºयांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. लोकप्रतिनिधी उपस्थित असूनही अधिकारी, महापालिकांचे आयुक्त उपस्थित न राहिल्यामुळे सभागृहात अधिकाºयांनी पालकमंत्र्यांना साकडे घालून या गैरहजर अधिकाºयांवर कडक कारवाईची मागणी लावून धरली.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे