धक्कादायक! भिवंडीत भांडण सोडवण्याच्या रागातून युवकाची हत्या
By नितीन पंडित | Updated: July 19, 2023 14:44 IST2023-07-19T14:44:34+5:302023-07-19T14:44:52+5:30
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! भिवंडीत भांडण सोडवण्याच्या रागातून युवकाची हत्या
भिवंडी: शहरातील गैबीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास एका युवकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा गैबीनगर परिसरातील वफा कॉम्प्लेक्स या परिसरात घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फरहान शेख वय २६ असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वफा कॉम्प्लेक्स या ठिकाणी अल्पवयीन युवकांमध्ये काही कारणांवरून भांडण झाले असता ते भांडण सोडवण्यासाठी काही युवक पुढे आले. त्यामध्ये फरहान शेख हा युवक सुध्दा होता.भांडण सोडवून झाल्या नंतर काही वेळाने अल्पवयीन युवक पुन्हा त्या ठिकाणी आले .तेथे त्यांना फरहान शेख हा त्यांच्या तावडीत सापडला .त्यांनी त्यास चाकूने भोसकले त्यामध्ये वर्मी घाव बसल्याने अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णलयामध्ये पाठवला.दरम्यान या घटने नंतर पोलिसांनी परिसरात माहिती घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.