फेसबुकवरील मैत्रीनंतर तरुणीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत केलं लग्न, त्यानंतर...
By सदानंद नाईक | Updated: January 16, 2025 18:29 IST2025-01-16T18:28:37+5:302025-01-16T18:29:18+5:30
Ulhasnagar Crime News: फेसबुकवरील मैत्री एका तरुणीला महागात पडली असून लॉजवर चोरून काढलेला बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवित तरुणीला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पैशासाठी या व्हिडीओची भीती तरुणीच्या नातेवाईकाना दाखवून पैसे उखळले.

फेसबुकवरील मैत्रीनंतर तरुणीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत केलं लग्न, त्यानंतर...
- सदानंद नाईक
उल्हासनगर - फेसबुकवरील मैत्री एका तरुणीला महागात पडली असून लॉजवर चोरून काढलेला बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवित तरुणीला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पैशासाठी या व्हिडीओची भीती तरुणीच्या नातेवाईकाना दाखवून पैसे उखळले. अखेर तरुणीने उल्हासनगर न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाच्या आदेशाने सुनीलसह ६ जणावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर पूर्वेतील एका तरुणी सोबत सुनील हिरानंदानी याने फेसबुकवर मैत्री केली. मैत्रीचा गैरफायदा उठवीत तीला एका लॉजवर नेऊन बलात्काराचा चोरून व्होडिओ काढला. या व्हिडिओची भीती दाखवून तरुणीसी सन-२०२१ साली लग्न केले. लग्नानंतर सुनीलसह त्याचे नातेवाईक तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. चोरून काढलेला बलात्काराचा व्होडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तरुणीच्या नातेवाईकाना देऊन अनेकदा पैसे उखळले. या सततच्या छळाला कंटाळून तरुणीने उल्हासनगर न्यायालयात दाद मागितल्यावर, न्यायालयच्या आदेशानंतर सुनील हिरानंदानी यांच्यासह ६ जणावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. सुनील हिरानंदानी याला पोलिसांनी अटक केली असून चौकशीनंतर इतरांना अटक करण्याचे संकेत पडवळ यांनी दिले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.