वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यू
By सदानंद नाईक | Updated: February 10, 2024 16:59 IST2024-02-10T16:58:03+5:302024-02-10T16:59:14+5:30
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे राहणारी सुचिता उर्फ शुभांगी मनीष बजाज ही गुरवारी सकाळी ७ वाजता कचरा कुंडीत टाकण्यासाठी गणपती मंदिर येथून अंबरनाथ मुख्य रस्ता ओलांडला.

वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यू
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी गावात राहणारी सुचिता उर्फ शुभांगी बजाज या महिलेला अंबरनाथ मुख्य रस्त्यावर गुरवारी सकाळी भरधाव वाहनाने धडक दिल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे राहणारी सुचिता उर्फ शुभांगी मनीष बजाज ही गुरवारी सकाळी ७ वाजता कचरा कुंडीत टाकण्यासाठी गणपती मंदिर येथून अंबरनाथ मुख्य रस्ता ओलांडला. पुन्हा रस्ता ओलांडून घरी येत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुचिता बजाज यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.