ठाण्यात गणेश मंडपावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

By सुरेश लोखंडे | Updated: September 9, 2022 22:48 IST2022-09-09T22:48:01+5:302022-09-09T22:48:29+5:30

महिलेला झाली होती कमरेला दुखापत.

A woman died after a tree fell on Ganesh Mandap in Thane | ठाण्यात गणेश मंडपावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

ठाण्यात गणेश मंडपावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

ठाणेठाणे (प.) येथे कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपतीच्या मंडपावर व दोन पार्क केलेल्या गाड्यांवर झाड पडल्याची घटना घडली होती. यामध्ये पाच जण जखमी झाली होते. त्यापैकी राजश्री वालावरकर (५५ वर्षे) यांना कमरेला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

प्रतिक वालावरकर (३० वर्ष) यांना उजव्या डोळ्याला व कमरेला दुखापत झाली होती.त्यानंतर त्यांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय कीविन्सी परेरा, सुहासिनी कोलुंगडे, दत्ता जावळे यांना किरकोळ दुखापत झाली. कोलबाड, जाग माता मंदीर जवळ, सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते.

Web Title: A woman died after a tree fell on Ganesh Mandap in Thane

टॅग्स :thaneठाणे