भिवंडीतील सारंगगाव मतदान केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन
By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 19:54 IST2024-05-20T19:30:26+5:302024-05-20T19:54:21+5:30
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ मोडतात.अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा,यासाठी मतदानाचे महत्व व अधिकार याबाबत जिल्हा प्रशासना कडून जनजागृती,मतदानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.

भिवंडीतील सारंगगाव मतदान केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन
नितीन पंडित
भिवंडी : एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला असला तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतीचे दर्शन घडले.या मतदान केंद्रावर पारंपरिक पद्धतीचा पेहराव केलेले केंद्र प्रमुख व कर्मचारी दिसून आले. तर, केंद्राच्या बाहेर टोपल्या,बोट,रांगोळी काढण्यात आली होत्या.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघ मोडतात.अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा,यासाठी मतदानाचे महत्व व अधिकार याबाबत जिल्हा प्रशासना कडून जनजागृती,मतदानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. असे असताना, दुसरीकडे यंदाच्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात तेथील संस्कृतीवर आधारित एक आगळेवेगळे मतदान केंद्राची निर्मिती करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३२१ येथे वैशिष्ठ्यपूर्ण मतदान केंद्र बनविण्यात आले होते. या गावात ६६८ मतदार आहेत.
या मतदान केंद्रावर कोळी आगरी समाजाची छाप दिसून आली.या मतदान केंद्रावर मासळी पकडण्या साठी वारण्यात येणारे जाळी, मासळी विक्री साठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी काढण्यात आल्याचे दिसून आले.तर मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी हे सुध्दा पारंपारिक आगरी कोळी पेहराव्यात दिसून आले.