शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 06:10 IST

इमारत ४० वर्षे जुनी होती, मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश

Bhiwandi Building Collapse: शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला असून शनिवारी मध्यरात्री एक धोकादायक  दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना ठीगाऱ्या खालून बाहेर काढण्यात भिवंडी अग्निशामक दलाला यश मिळालेला आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही ४० वर्षांहून जुनी धोकादायक इमारत असून तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील दोन मजली निवासी वापर आहे.या इमारती च्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला.या दुर्घटनेत पहिल्या मजल्या वरील कुटुंब या ठीगाऱ्याखाली दबले होते.स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान दाखल होत त्यांनी ठीगाऱ्या खालून एकूण सात जणांना बाहेर काढले.त्यापैकी तस्निम कौसर मोमीन वय ८ महिने व उझ्मा अब्दुल लतिफ मोमीन वय ४० वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतिफ मोमीन वय ६५ वर्ष,फरजान लतिफ मोमीन वय ५० वर्ष,बुशरा आतिफ मोमीन वय ३२ वर्ष, अदीमा लतिफ मोमीन वय ७ वर्ष,उरूसा अतिफ मोमीन वय ३ वर्षे हे जखमी झाले आहेत.या सर्व जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी अब्दुल लतिफ मोमीन यांची प्रकुर्ती गंभीर असून अदीमा लतिफ मोमीन व उरूसा अतिफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत.

घटनास्थळी रात्री उशिरा पालिका आयुक्त अजय वैद्य हे दाखल होत त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.ही इमारत धोकादायक होती कि कसे या बाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती आयुक्त वैद्य यांनी दिली आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडीDeathमृत्यू