सदानंद नाईक, उल्हासनगरउन्हाळी शिबिरा दरम्यान डान्स क्लास चालविणाऱ्या टीचरने एका तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून डान्स शिक्षकांलापोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर पूर्वेत उन्हाळी सुट्टीत डान्स क्लास चालविणाऱ्या दुलानी नावाच्या शिक्षकाकडे पालक मोठ्या विश्वासाने मुलांना नृत्य शिकवण्यासाठी पाठवत होते.
तीन वर्षाच्या मुलासोबत काय घडलं?
दोन दिवसापूर्वी डान्स शिबिरात विश्रांती घेत असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाला दुलांनी नावाच्या टीचरने शेजारील अंधारी खोलीत नेऊन कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर मुलावर अत्याचार केला.
घटना कशी आली उघडकीस?
मुलाला त्रास झाल्यावर त्याने झालेल्या प्रकाराची माहिती आई-वडीलांना दिली. त्यांना झालेल्या घटनेने धक्का बसून त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून दुलांनी नावाच्या डान्स टीचरवर गुन्हा दाखल करून अटक केली.
विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री दुलांनी टीचरच्या घरी धाड टाकून अटक केली. दुलानीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
असाच प्रकार डान्स क्लास मधील इतर मुलावर झाला का? याबाबत पोलीस डान्स क्लास मधील मुलांना विश्वासात घेऊन चौकशी करीत आहेत. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून पालकांनी मुलांना डान्स क्लासला पाठविणे बंद केले.