रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने मारला डल्ला; भाईंदरमधील घटना
By धीरज परब | Updated: September 1, 2022 16:15 IST2022-09-01T16:10:14+5:302022-09-01T16:15:01+5:30
भाईंदरमध्ये एका रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने डल्ला मारला आहे.

रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने मारला डल्ला; भाईंदरमधील घटना
मीरारोड - भाईंदरमध्ये एका रखवालदाराच्या घरावरच चोरटयाने डल्ला मारला आहे. दार ढकलून चोरटा सहज घरात शिरला. भाईंदर पश्चिमेच्या राई येथील शिवनेरी गल्ली ७ मध्ये राहणारे कन्हैया झा हे रखवालदार असून कमलापार्क गृहसंकुलात गेल्या ४ वर्षां पासून रखवालदार आहेत. २९ ऑगस्टच्या मध्यरात्री २ च्या सुमारास झा दाम्पत्य जेवण करून झोपले. पहाटे पावणे पाच वाजता ते उठले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.
पत्नी रेशमी ला उठवले आणि सामान तपासू लागले. त्यात घरातील २ मोबाईल , पत्नीचे मंगळसूत्र व अन्य चांदीचा दागिना, रोख असा ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला आढळला. घराचा दरवाजा ढकलुन आतील कडी तुटलेली असल्याने घरात प्रवेश करून लोखंडी पत्र्याचे उघड्या कपाटात ठेवलेला ऐवज चोरून नेल्याचे भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नमूद आहे . भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहेत.