भिवंडीत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा वर्षीय बालकाचा मृत्यू
By नितीन पंडित | Updated: July 3, 2023 00:38 IST2023-07-03T00:38:23+5:302023-07-03T00:38:55+5:30
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

भिवंडीत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा वर्षीय बालकाचा मृत्यू
भिवंडी : शहरातील दर्गारोड दिवान शहा रस्त्यावरील कोतवाल शहा दर्गा जवळील कोतवाल चाळ येथे एका कारखान्याची जूनी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत दुसरा एक मुलगा जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मो हुसेन मो इरफान अन्सारी असे मयत मुलाचे नाव आहे.तो दर्गा रोड दिवानशाह येथील कोतवाल चाळ जवळील एका घरा जवळ मित्रा सोबत सायंकाळी खेळत असताना अचानक लगत असलेली कारखान्याची जीर्ण झालेली भिंत कोसळल्याने दोन्ही मुले मातीच्या ढिगाऱ्या खाली दबले. ही घटना नागरिकांनी पाहताच त्यांनी मदत कार्य सुरू केले.या वेळी पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून स्व. इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले. मात्र हुसेन या मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे याबाबत भोईवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.