शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

Thane Tanker Accident: टॅंकरने रोखली घोडबंदरची वाहतूक; डिझेल टॅंक फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 09:47 IST

तातडीने टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे तसेच सांडलेल्या डिझेल आणि तेलावर माती पसरविण्याबरोबर पाण्याचा मारा करण्याचे काम हाती घेतले.

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या टँकरचा डिझेल टॅंक फुटला. तसेच त्या टॅन्कमधील डिझेलसह गाडीतील तेल रस्त्यावर सांडल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजजवळ घडली. या घटनेने सुमारे तीन तासांसाठी घोडबंदर रोड रोखून धरला. तसेच उलटलेल्या टँकरमध्ये दहा टॅन केमिकल होते. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

दिलीप पाटील यांच्या मालकीचा केमिकल टँकर चालक दीपक यादव हे गुजरात अंकलेश्वर येथून रत्नागिरी,एमआयडीसी येथे टँकर घेऊन निघाले होते. मुंबई - गुजरात महामार्गावरील घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेने जाताना, पातलीपाडा ब्रिजजवळ आल्यावर चालक यादव यांचे त्या टँकरवरील ताबा सुटला आणि रस्त्यावरील दुभाजकावर आदळून रस्त्याच्या मधोमध उलटला. यावेळी टँकर मधील डिझेल टॅंक फुटला आणि त्यामधील डिझेल रस्त्यावर सांडले तसेच गाडीतील तेल ही रस्त्यावर सांडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली.

तातडीने टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे तसेच सांडलेल्या डिझेल आणि तेलावर माती पसरविण्याबरोबर पाण्याचा मारा करण्याचे काम हाती घेतली. यावेळी, दोन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने तो टँकर उचलून बाजूला केला. तर, टँकरला साधारणपणे तीन तासांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतुक पूर्वपदावर आली. त्या अपघातग्रस्त टँकर मध्ये १० टन Ethyl Benzyl Aniline (EBA) केमिकल होते.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात