मुलीला नांदवत नसल्याने नवऱ्याच्या गुप्त अंगावर वार; गुन्हा दाखल

By पंकज पाटील | Updated: October 25, 2023 18:13 IST2023-10-25T18:13:09+5:302023-10-25T18:13:26+5:30

फिर्यादी बिपिन चौधरी याचा विवाह प्रियंका कनोजिया तिच्यासोबत झाला होता.

A stab on the private part of the husband for not sleeping the girl; Filed a case in ambernath | मुलीला नांदवत नसल्याने नवऱ्याच्या गुप्त अंगावर वार; गुन्हा दाखल

मुलीला नांदवत नसल्याने नवऱ्याच्या गुप्त अंगावर वार; गुन्हा दाखल

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम भागातील कमलाकर नगर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नी, सासरा आणि मेहुण्याने आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या गुप्त अंगावर देखील वार करण्यात आले आहेत.  

फिर्यादी बिपिन चौधरी याचा विवाह प्रियंका कनोजिया तिच्यासोबत झाला होता. मात्र त्यांच्यात फारच जमत नसल्यामुळे ते दोघे विभक्त राहत होते. आपली मुलगी प्रियांका हिला तिचा नवरा नांदवत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सासरा चिंतामणी, पत्नी प्रियंका, मेहुणा साहिल आणि चुलत सासरा संतोष हे बिपिन त्यांच्याकडे आले. आपल्या मुलीला का नांदवत नाही याचा जाब विचारत असताना या आरोपींचे बिपिन यांच्यासोबत वादावादी झाली आणि त्यानंतर हाणामारी सुरू झाली. 

यावेळी आरोपी संतोष याने बिपिनच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली तर आरोपी साहिल यांनी त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने बीपीनेच्या गुप्त अंगावर वार केले. जखमी बीपीन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या उपचार सुरू असून अंबरनाथ पोलिसांनी चिंतामणी, साहिल, संतोष आणि पत्नी प्रियंका या चौघांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

Web Title: A stab on the private part of the husband for not sleeping the girl; Filed a case in ambernath