भिवंडीत सहा महिन्यांचे बाळ हरवले, शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By नितीन पंडित | Updated: April 15, 2023 18:15 IST2023-04-15T18:15:07+5:302023-04-15T18:15:15+5:30
शहबाज मोहम्मद याइय्या अंसारी वय २७ वर्ष राहणार न्यू आझाद नगर शांतीनगर हे आपली पत्नी शबाना हिच्या सोबत शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी गेले होते.

भिवंडीत सहा महिन्यांचे बाळ हरवले, शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
भिवंडी - बाजारात खरेदीसाठी जात असताना सहा महिन्यांचे बाळ शेजारीणीकडे ठेवून बाजारात खरेदीसाठी जाऊन खरेदी करून घरी परतलेल्या दांपत्याला आपले सहा महिन्यांचे बाळ शेजारणीकडे सापडले नसल्याने बाळ हरवल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री करण्यात आली आहे.
शहबाज मोहम्मद याइय्या अंसारी वय २७ वर्ष राहणार न्यू आझाद नगर शांतीनगर हे आपली पत्नी शबाना हिच्या सोबत शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी गेले होते. यावेळी आपले सहा महिन्यांचे लहान बाळ अरबाज यास शेजारी राहणाऱ्या फातिमा भाभी यांच्याकडे दिले होते त्यानंतर शहबाज व त्यांची पत्नी बाजारातून सामान खरेदी करून पुन्हा घरी परतल्यानंतर आपले सहा महिन्यांचे बाळ फातिमा भाभी यांच्याकडून परत घेण्यासाठी गेले असता बाळ त्यांच्या घरी सापडले नाही. त्यानंतर परिसरात बाळाचा शोध घेतल्या असता ही बाळ सापडले नसल्याने अखेर शेहबाज याने बाळ हरवल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
फातिमा भाभी हिच्याकडे चौकशी केली असता मी झोपले असता शहबाज यांनी बाळ कधी आणून ठेवले व ते कधी गेले याबाबत मला काही एक माहीत नाही अशी माहिती फातिमा भाभी यांनी शांतीनगर पोलिसांना दिली असून बाळ अजूनही सापडले नाही अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.