आपला उमेदवार नरेंद्र मोदी; ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात एकच नारा

By अजित मांडके | Updated: April 3, 2024 20:35 IST2024-04-03T20:34:40+5:302024-04-03T20:35:10+5:30

ठाणे लोकसभेचा पहिला मेळावा बुधवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा मध्ये घेण्यात आला

A single slogan at the gathering of our candidate Narendra Modi Mahayuti | आपला उमेदवार नरेंद्र मोदी; ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात एकच नारा

आपला उमेदवार नरेंद्र मोदी; ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात एकच नारा

ठाणे : ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण, नवऱ्याचा पत्ता नाही आणि लग्नाची वरात वाजविली जात असल्याची चर्चा सुरू असताना, उमेदवार कोण हा प्रश्न विचारला जात असला तरी आपले उमेदवार नरेंद्र मोदी असून, त्यांना आपल्याला निवडून द्याचे आहे असा नारा महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आदी पक्षांनी यावेळी दिला.

ठाणे लोकसभेचा पहिला मेळावा बुधवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा मध्ये घेण्यात आला. या मेळाव्याला शिवसेना प्रवक्ते  नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक,रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माधवी नाईक, राष्ट्रवादीचे प्रवत्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत आदीसह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ठाणे लोकसभेचा अद्याप उमेदवार जाहीर झाला नसताना महायुतीच्या माध्यमातून बुधवार पासून मेळावे घेण्यास सुरवात केली आहे, मात्र प्रचार कोणाचा करायचा असा सवाल विरोधकाकाढुन केला जात आहे, असे असताना आमचा उमेदवार नरेंद्र मोदी असल्याचा नारा पहिल्याच मेळाव्यात निरंजन डावखरे, माधवी नाईक, नरेश म्हस्के आदी सह सर्वच पदाधिकारी यांनी दिला. तसेच उमेदवार कोण याचा विचात न करता केवळ महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचा नारा यावेळी देण्यात आला.

Web Title: A single slogan at the gathering of our candidate Narendra Modi Mahayuti