शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 22:20 IST

दुसरीकडे नाखवा लार्सन व अन्य मच्छीमारांनी नागवंशी ह्याचा शोध चालवला होता.

धीरज परब

मीरारोड - उत्तनच्या मासेमारी बोटीतून खोल समुद्रात पडलेला ३८ वर्षीय खलाशी हा तासभर पोहत दुसऱ्या बोटीवर आश्रयास गेला. चौथ्या दिवशी तो मध्यरात्री नंतर घरी परतला, तेव्हा नाखवा व कुटुंबियांना शॉक बसला.  हा भूत आहे का याची धडकीच त्यांनी घेतली मात्र हा खलाशी खरंच जिवंत परतलेला पाहून मच्छीमार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. त्याचा पुनर्जन्म झाला म्हणून मच्छीमारांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

भाईंदरच्या उत्तन येथील लार्सन रेमंड बाड्या यांची सीएरा नावाची नौका मासेमारी करिता खोल समुद्रात गेली होती. ३ जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास बोटीवरचा खलाशी सियाराम नागवंशी हा बोटीतून खाली कधी पडला हेच तांडेल यांना समजले नाही. काही वेळाने तांडेल यांना नागवंशी हा बोटीवर नसल्याचे लक्षात आले. बोट तीन नोटिकल मैलावर असल्याने तांडेल यांनी नाखवाच्या घरी संपर्क करून घडलेली घटना सांगितली. बोट मालक लार्सन रेमंड बाडया यांनी त्याला शोधण्याच्या सूचना तांडेल यांना देत उत्तन सागरी पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी तुम्ही शोध घ्या व २४ तासानंतर तक्रार नोंद करू असं सांगितले.

दुसरीकडे नाखवा लार्सन व अन्य मच्छीमारांनी नागवंशी ह्याचा शोध चालवला होता. मात्र ६ जानेवारीच्या पहाटे १.३० च्या सुमारास नागवंशी हा उत्तन कोळीवाड्यात परतला. लार्सन व कुटुंबियांना तर विश्वासच बसला नाही. सुरुवातीला घरात भूत आला असं त्यांना वाटले. त्यांनी धर्मगुरू यांना कॉल केला. प्रार्थना करत घराचे सर्व दिवे लावले. त्याला चिमटा काढून खात्री केली. नागवंशी असल्याची खात्री पटताच लार्सन व त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. त्याला नवीन जीवन मिळाल्याचा आनंद मच्छीमार कुटुंबियांनी नागवंशीच्या हस्ते केक कापून साजरा केला. 

बोटीतून पडल्यावर गच्च काळोख आणि समुद्राच्या लाटांवर नागवंशी हे पोहत राहिले. पोहण्यात अडचण होऊ नये म्हणून त्यांनी कपडे काढून टाकले. गच्च काळोखात दूरवर एका बोटीची लाईट दिसली. जीव वाचविण्याच्या जिद्दीने नागवंशी हे जवळपास तासभर समुद्रात पोहत पोहत त्या बोटीवर पोहचले. त्या मच्छीमारांनी नागवंशी ह्याला खाऊ पिऊ घातले. किनाऱ्याला नेऊन सोडले. त्याला पैसे खर्चाला दिले. उरण भागात तो पोहचला असावा अशी शक्यता आहे. महामार्गावर त्याने अंगात घालण्यास कपडे घेतले. तिकडून ठाणे येथून लोकल पकडून भाईंदरला पोहचले. भाईंदर वरून चालत उत्तन गाठले अशी माहिती लार्सन यांनी दिली. 

समुद्रात बोटीतून पडल्यानंतर नागवंशी सापडला नसल्याने तो मरण पावला अशी खात्री मच्छीमारांना झाली होती. समुद्र किनाऱ्यास मृतदेह लागला आहे का याचा शोध पण घेतला असल्याचं मच्छीमार नेते मॅलकम कासुघर म्हणाले. रात्री १:३० वाजता अचानक लार्सन रेमंड बाडया यांच्या घराचा दरवाजा वाजल्याने दार उघडले तर समोर सियाराम नागवंशी उभा होता. त्याने घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fisherman falls into sea, returns after 4 days, family shocked!

Web Summary : Fisherman Siaram Nagvanshi fell from a boat into the sea and swam for an hour to another boat. He returned home after four days, shocking his family who initially mistook him for a ghost. The family celebrated his miraculous return.