संविधान बदलाची फक्त अफवा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं विरोधकांना उत्तर
By सदानंद नाईक | Updated: January 21, 2023 20:03 IST2023-01-21T20:02:38+5:302023-01-21T20:03:08+5:30
जनसंपर्क कार्यालयाचे आठवलेच्या हस्ते उदघाटन, मोदींच्या सत्तेत संविधान बदलणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच सर्वानी निळ्या झेंड्या खालीच राहिल पाहिजे, इकडे तिकडे जावू नका असं आठवले म्हणाले.

संविधान बदलाची फक्त अफवा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं विरोधकांना उत्तर
उल्हासनगर : मोदीच्या सत्तेत संविधान बदली होणार असल्याच्या अफवा असून तसा कोणी प्रयत्न करणार नाही. असे वक्तव्य जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी रात्री केले. यावेळी रिपाइंचे कार्यक्रते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.
उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या प्रसिध्द उद्योजक व पद्मश्री कल्पनाताई सरोज यांचे सहभागी डॉ मन्नान गोरे यांचे ७ जानेवारी रोजी दुखद निधन झाले. त्या निमित्ताने रिपाइं आठवले गटाने शहरातील टाऊन हॉल येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन केले होते. या श्रध्दांजली सभेला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे श्रध्दांजली वाहन्यासाठी आले होते. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर कॅम्प नं-३, सम्राट अशोकनगर मधील पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री झाले. यावेळी त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून संविधान बदलण्याची अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या सत्तेत संविधान बदलणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच सर्वानी निळ्या झेंड्या खालीच राहिल पाहिजे, इकडे तिकडे जावु नका. असा सल्ला उपस्थितीत कार्यकर्त्याना दिला. यावेळी सम्राट अशोकनगर वार्डच्या अध्यक्ष पदी निलेश ढोके यांची नियुक्तीची घोषणा आठवले यांनी केली. कार्यक्रमाला पक्षाचे गौतम सोनवणे, शहरजिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर भगवान भालेराव, भारतीय दलित पॅंथरचे प्रथम नगरसेवक महादेव सोनवणे, गौतम ढोके आदीजन उपस्थित होते.