रिक्षा चालकाची मुजोरी; थेट रेल्वे फलाटात आणले वाहन, आंबिवलीतील घटना

By अनिकेत घमंडी | Updated: September 7, 2022 18:41 IST2022-09-07T18:27:29+5:302022-09-07T18:41:30+5:30

रेल्वे सुरक्षा दलाने व्हिडिओच्या आधारावर त्या रिक्षा चालकाचा शोध सरू केला आहे.

A rickshaw driver brought rickshaw directly to railway platform, incident in Ambivali | रिक्षा चालकाची मुजोरी; थेट रेल्वे फलाटात आणले वाहन, आंबिवलीतील घटना

रिक्षा चालकाची मुजोरी; थेट रेल्वे फलाटात आणले वाहन, आंबिवलीतील घटना

डोंबिवली: शहरातील काही मुजोर रिक्षाचालकांचा मनमानी कारभार वाढला असून त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. आता आंबिवली रेल्वे स्थानकात तर एका रिक्षा चालकाने थेट वाहन रेल्वे फलाटात आणल्याची घटना सोमवारी घडली असून त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

समाज माध्यमांवर त्या मुजोर रिक्षाचालकाबद्दल नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. स्थानकातील प्रवासी त्यास विरोध करत होते, मात्र वाहन सुरू असल्याने कोणी पुढे गेले नाही. या घटनेची रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेने देखील गंभीर दखल घेतली असून त्या चालकाचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी व्हिडिओचा आधार घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने त्या घटनेत कोणाचाही अपघात झाला नाही.

पहा व्हिडिओ:-

Web Title: A rickshaw driver brought rickshaw directly to railway platform, incident in Ambivali