मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 13:25 IST2023-06-17T13:25:00+5:302023-06-17T13:25:52+5:30
कारण मात्र अस्पष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नितीन कंपनी समोरील निवास स्थानासमोर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. विनय पांडे असं त्यांचं नाव असून ते शिवसेना शिंदे गटाचे कोपरी पाचपाखाडी येथील पदाधिकारी आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे कोपरी पाचपाखाडी पदाधिकारी आणि रिक्षा चालक असलेल्या विनय पांडे यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळापूर्वी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. विनय पांडे यांनी नेमकं कशामुळे हे पाऊल उचललं याचा तपास करण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितलं.