उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अॅक्टिव्ह गाडीचे नुकसान
By सदानंद नाईक | Updated: July 25, 2023 18:11 IST2023-07-25T18:08:29+5:302023-07-25T18:11:12+5:30
सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.

उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अॅक्टिव्ह गाडीचे नुकसान
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील कुर्ला कॅम्प कैलास कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी झाड कोसळून रिक्षा व अॅक्टिव्हा गाडीचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ काली माता चौक कुर्ला कॅम्प रोडवर मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान जुने झाड संततधार पावसाने कोसळले. यामध्ये एका रिक्षा व अॅक्टिव्हा गाडीचे नुकसान झाले असून रिक्षा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. शहरात झाडाचे सर्वेक्षण झाले असून पर्यावरण विभागाने अद्यापही धोकादायक झाडे घोषित केले नाही. संततधार पावसाने सोमवारी कॅम्प नं-५ मुख्य रस्त्यावरील झाड जाणाऱ्या एका ट्रकवर कोसळल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडे कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाले असून मंगळवारी दुपारी कुर्ला कॅम्प रोडवर जुने झाड पडले. अग्निशमन विभागाचे सुरक्षा रक्षक रस्त्यावरून झाडे उचलण्याचे प्रयत्न करीत आहेत.