धक्का लागल्याच्या रागातून चाकूने हल्ला; जखमीवर रुग्णालयात उपचार

By सदानंद नाईक | Updated: August 25, 2023 20:33 IST2023-08-25T20:33:17+5:302023-08-25T20:33:23+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३, आंचल पॅलेस हॉटेल मध्ये दारू पिण्यासाठी जात असताना दरवाजा जवळ अफान जावेद खान यांचा गणेश वसीठा याला धक्का लागला

A knife attack out of anger at being shocked; Treat the injured in hospital | धक्का लागल्याच्या रागातून चाकूने हल्ला; जखमीवर रुग्णालयात उपचार

धक्का लागल्याच्या रागातून चाकूने हल्ला; जखमीवर रुग्णालयात उपचार

उल्हासनगर : कॅम्प नं-३, आंचल हॉटेल मध्ये दारू पिण्यासाठी गेलेल्या तरुणांचा गुरवारी सायंकाळींसाडे सात वाजता धक्का लागला या रागातून चौकडीने तरुणाला मारहाण करून चाकूने वार केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौकडी विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, आंचल पॅलेस हॉटेल मध्ये दारू पिण्यासाठी जात असताना दरवाजा जवळ अफान जावेद खान यांचा गणेश वसीठा याला धक्का लागला. यावेळी चुकून धक्का लागल्या बाबत अफान याने माफी मागितली. मात्र धक्का लागल्याच्या रागातून गणेश वसीठा याने शिवीगाळ केली. तसेच रवी वसीठा, तारेश शेट्टी व सैफुद्दीन शेख यांनी लाकडी दांडक्याने अफान खान याला मारहाण करून गणेश वसीठा याने चाकूने वार केले. याप्रकरणी सैफउद्दीन शेख, तारेश शेट्टी, गणेश वसीठा व रवी वासीठा यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर जखमी अफान खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे

Web Title: A knife attack out of anger at being shocked; Treat the injured in hospital