शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांना एक न्याय आणि...; केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 14:23 IST

Ketki Chitale's lawyer Yogesh Deshpande asked the question : मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे. मग केतकी चितळेला एक न्याय आणि मंत्री महोदय यांना एक न्याय का ? असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी विचारला आहे.

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र, ज्या पद्धतीने केतकी चितळे हिने पोस्ट केली होती. त्याचप्रमाणे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे. मग केतकी चितळेला एक न्याय आणि मंत्री महोदय यांना एक न्याय का ? असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी विचारला आहे. केतकीचे वकील वसंत बनसोडे यांनी दाखल केला जामीन अर्ज देखील दाखल केला आहे. केतकी चितळे हिच्यावर राज्यभर गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी केतकीचे वकील योगेश देशपांडे ,यसस लीगल करणार असल्याचे  सांगितले आहे.

राज्यात अनेकविध ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, २०२० मधील एका प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला तरीही तिला रबाळे पोलिसांनी अटक न केल्याचे प्रकरण उजेडात आणण्यात आले. यानंतर केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सुरुवातीला केतकी चितळेला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.

आता मात्र, तिला याच प्रकरणात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  तसेच रबाळे पोलीस स्थानकात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील वसंत बनसोडे यांनी जामीन अर्ज केलेला आहे. उद्यापर्यंत या जामिनावर युक्तिवाद होणार आहे. केतकी चितळे यांची कुठलीही पोलिसांबाबत तक्रार नाही. तिला ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेPoliceपोलिसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडadvocateवकिलAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा