मुंब्र्यातील दोन घरांवर उच्च दाबाची वीज वाहिनी कोसळली; एकाच कुटुंबातील चार जण जखमी
By कुमार बडदे | Updated: May 22, 2023 17:05 IST2023-05-22T17:05:13+5:302023-05-22T17:05:43+5:30
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना दिलासा दिला.

मुंब्र्यातील दोन घरांवर उच्च दाबाची वीज वाहिनी कोसळली; एकाच कुटुंबातील चार जण जखमी
मुंब्राः येथील शिवाजी नगर भागातील जानकी व्हीला या इमारती जवळ असलेल्या बाबू पाटील चाळीच्या बाजूला असलेल्या बादशहा इस्लाम आणि फरीदा कुरेशी यांच्या तळ अधिक एक मजली घरांवर टाटा पाँवर कंपनीची उच्च दाबाची वीज वाहिनी सोमवारी दुपारी कोसळली.यामुळे लागलेल्या आगीत भाडेतत्वावर रहात असलेल्या एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले.
अलिमउद्दिन कुरेशी (वय ३५),सलमा सय्यद (वय ३०),अलीना सय्यद (वय ५ ) आणि फातिमा सय्यद(वय ४)अशी जखमीची नावे असून,त्यांची छाती आणि चेहरा भाजला आहे.उपचारांसाठी त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.आगीत दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,घरातील काँम्पुटर,लाकडी कपाट,शेगडी भांडी,पलंग,आदी संसार उपयोगी वंस्तू जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहन आणि एक फायर वाहनाच्या मदतीने एक तासात अथक प्रयत्नानी आग विझवली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना दिलासा दिला. तसेच त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्ण वाहिकेची व्यवस्था केली. सोमवारी ज्या ठिकाणी वाहिनी कोसळली त्या ठिकाणी या आधिही काही वेळा वाहिनी कोसळल्याची घटना घडली आहे. ती पुन्हा कोसळू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशां कडून करण्यात येत आहे.