Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात रिक्षाचालकाच्या घराला आग

By पंकज पाटील | Updated: April 7, 2023 17:43 IST2023-04-07T17:43:03+5:302023-04-07T17:43:30+5:30

Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

A fire broke out at a rickshaw puller's house in Chinchvali village of Ambernath taluk | Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात रिक्षाचालकाच्या घराला आग

Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात रिक्षाचालकाच्या घराला आग

- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी रिक्षाचालक कुटुंबाची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली. अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात गुरुवारी हनुमान जयंती निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिक्षाचालक सतीश कुंभारकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र रात्री अचानक घराला आग लागल्याने घरातील सर्व साहित्य हे जाळून खाक झाले. याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कुंभारकर कुटुंबाची भेट घेत त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून अन्य साहित्य दिले जाणार आहे.

Web Title: A fire broke out at a rickshaw puller's house in Chinchvali village of Ambernath taluk