खरकट्याचे पाणी टाकल्या वरून शेजाऱ्यात हाणामारी 

By धीरज परब | Updated: December 27, 2022 11:24 IST2022-12-27T11:22:59+5:302022-12-27T11:24:27+5:30

उत्तन सागरी पोलिस ठाण्यात शेजाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

A fight broke out between the neighbours over the pouring of water | खरकट्याचे पाणी टाकल्या वरून शेजाऱ्यात हाणामारी 

खरकट्याचे पाणी टाकल्या वरून शेजाऱ्यात हाणामारी 

मीरारोड - भाईंदरच्या पाली बंदर येथे शेजाऱ्यां मध्ये जेवणाच्या खरकट्याचे पाणी टाकण्या वरून हाणामारी झाली आहे. उत्तन सागरी पोलिस ठाण्यात शेजाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

पालीबंदर येथे बेनी झुजे कोनत्या व  ब्रुनो दालमेत हे शेजारी आहेत . ह्या दोन्ही कुटुंबात कचरा टाकण्या वरून नेहमीच भांडणे होत आली आहेत . २३ डिसेंबर रोजी ब्रूनोची बायको वंदना हिने रात्रीचे जेवणाचे खरकट्याचे पाणी त्यांच्या स्वयंपाक घराच्या खिडकीतुन खाली फेकले.  ते खरकट्याचे पाणी बेनी यांच्या घरासमोर सुकत घाललेल्या कपड्यांवर पडले.

बेनी यांनी त्याचा जाब विचारला असता ब्रुनो, त्याचा मुलगा दानियल व इतर यांनी बेनी यांना शिवीगाळी करत मारहाण केली. बेनी यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्त बंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात येऊन ब्रुनो व त्यांच्या परिवारा विरोधात तक्रार दिली. तर ब्रुनो कुटुंबीयांनी सुद्धा बेनी परिवारा विरोधात मारहाण, शिवीगाळ प्रकरणी फिर्याद दिली . 

Web Title: A fight broke out between the neighbours over the pouring of water