शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला बिष्णाेई टाेळीच्या नावाने मागितली दहा कोटींची खंडणी, नाैपाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:36 IST

पोलिसांकडे तक्रार केल्यास ‘एन्काऊंटर’ करण्याचीही दिली धमकी...

ठाणे: बिष्णाेई ग्रुपमधून बाेलत असल्याचा दावा करीत ‘दस कराेड भेज दाे, यदी नही भेजा, ताे मरनेके लिए तयार रहाे.. रेकाॅर्ड कराे, या पुलिस काे जाके बता दाे, तेरा एन्काऊंटर पक्का है’ अशी धमकी बिष्णोई टोळीच्या नावाने ठाण्यातील एका बिल्डरला व्हाट्सएप कॉलवरुन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून आराेपीचा शाेध घेण्यात येत असल्याचे नाैपाडा पाेलिसांनी शनिवारी सांगितले.ठाण्यात राहणाऱ्या या ६० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने २० फेब्रुवारी २०२६ राेजी नाैपाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीनिमित्त पूजेच्या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशातील सतना जिल्हयातील शिवराजपूर येथे यातील तक्रारकर्ते व्यावसायिक असतांना त्यांना एका आंतरराष्ट्रीय माेबाईल क्रमांकावरून व्हाट्सअँपवर दुपारी काही कॉल आले होते. मात्र पूजेच्या कार्यक्रमात असल्यामुळे त्यांनी हे कॉल घेतले नाही. त्यानंतर त्यांना सायंकाळी ७.१६ ते ७.३५ वाजेच्या दरम्यान पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आले. यावेळी त्यांनी फोन घेतला असता त्यावर बोलणाऱ्या व्यक्तीने बिष्णाेई ग्रृपमधून बाेलत असल्याचा दावा करीत दहा काेटींची मागणी केली. पेसे पाठविले नाहीतर मरण्यास तयार तयार रहा, अशी हिंदी भाषेत धमकी दिली. त्यानंतर हे व्यावसायिक ठाण्यात परतल्यानंतर पुन्हा २० फेब्रुवारी रोजी दुपारी ते पाचपाखाडी येथील कार्यालयात असतांनाही त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आले. सुरुवातीला त्यांनी ते घेतले नाही. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना एक ऑडिओ क्लिप पाठविली. त्यातही त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने नौपाडा पोलिस ठाण्यात खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane builder receives extortion threat of ₹10 crore from Bishnoi gang.

Web Summary : A Thane builder received a ₹10 crore extortion demand via WhatsApp from someone claiming to be from the Bishnoi gang, threatening death. A police case has been registered at Naupada police station, and an investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस