बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग

By पंकज पाटील | Published: March 2, 2024 02:53 PM2024-03-02T14:53:36+5:302024-03-02T14:54:03+5:30

Badlapur Railway Fire: बदलापूर रेल्वे स्थानकात जवळील साईडला उभी करून ठेवण्यात आलेल्या एक्सप्रेस ट्रेनच्या एका डब्याला शुक्रवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. मात्र एक्सप्रेसचा संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे.

A coach of an express train standing on the siding near Badlapur railway station caught fire | बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग

बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग

- पंकज पाटील 
बदलापूर - बदलापूर रेल्वे स्थानकात जवळील साईडला उभी करून ठेवण्यात आलेल्या एक्सप्रेस ट्रेनच्या एका डब्याला शुक्रवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. मात्र एक्सप्रेसचा संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या साईडिंगला उभी करून ठेवण्यात आलेल्या एक्सप्रेस गाडीच्या डब्याला शुक्रवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच बदलापूर रेल्वे प्रशासनाने लागलीच एक वाजून वीस मिनिटांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाची गाडी एक वाजून 45 मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. 22 फेब्रुवारी पासून ही एक्सप्रेस गाडी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या साईडिंगला उभी करून ठेवण्यात आली होती.

या एक्सप्रेस गाडीला पुण्याला जाणे अपेक्षित होते. मात्र साईडिंगसाठी जागा नसल्याने ती गाडी बदलापूर स्थानकाजवळील साईडिंगला थांबवण्यात आली होती. नेमकी ही आग लागली कशी याचा रेल्वे प्रशासन तपास करीत आहेत. आगीच्या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी काही वेळासाठी रेल्वे सेवा थांबवावी लागली होती. या आधीच्या घटनेत एक्सप्रेसचा संपूर्ण डबा जळून खाक झाला.

Web Title: A coach of an express train standing on the siding near Badlapur railway station caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.